गझलकार मगन सुर्यवंशी यांना मराठी साहित्य संमेलनात निमंत्रण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पातोंडा येथील रहिवासी सेवानिवृत्त प्राचार्य तथा जेष्ठ अहिराणी भाषा साहित्यिक व कवी मगन सूर्यवंशी यांना अमळनेर येथे होत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलकट्टा ह्या मंचावर गझल सादर करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले असून संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी त्या आशयाचे निमंत्रण पत्र पाठवले आहे.

प्रा. मगन सूर्यवंशी हे अहिराणी भाषेच्या राज्य समितीचे पदाधिकारी असून अहिराणी भाषावार त्यांच्या आजपर्यंत विविध लेख, कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचे अहिराणी भाषेवर चांगले प्रभुत्व असून अहिराणी भाषावार नेहमी लिखाण करून ते राज्यभर अहिराणी भाषेचा जागर व प्रसार करीत आहेत. त्यांचा ह्या कार्याची दखल घेऊन उद्यापासून अमळनेर येथे सुरू होत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना गझलकट्टा मंचावर गझल निवड समिती कडून त्यांना रविवारी गझल सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे पातोंडा व पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांची गझल ऐकण्यासाठी गझल रसिक प्रेमींनी येण्याचे आवाहन प्रा.मगन सूर्यवंशी यांनी केली आहे.

 

Protected Content