चोपडा विकासोमधून घनश्याम अग्रवाल विजयी

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चोपडा विकासो मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल यांनी सर्वच्या सर्व मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चोपडा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघांत खूप घटना घडल्या. यात महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलमधून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता होती. यात कॉंग्रेसला ही जागा सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर राष्ट्रवादीने याला प्रखर विरोध करून भाजपमधून नुकतेच पक्षात आलेले घनश्याम अग्रवाल यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला होता. यामुळे अखेर येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल आणि डॉ. सुरेश शामराव पाटील आणि संगीता प्रदीप पाटील हे तीन उमेदवार उरले होते. यात अरूणभाई गुजराथी यांची पूर्ण ताकद ही घनश्याम अग्रवाल यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजय सहजशक्य मानला जात होता. तर आजच्या निकालातून त्यांनी अक्षरश: एकहाती आणि एकतर्फी विजय संपादन केला आहे.

आज झालेल्या मतमोजणीत घनश्याम अग्रवाल यांना सर्वच्या सर्व ६३ मते मिळाली. यामुळे त्यांची संचालकपदी निवड करण्यात आली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!