घरकूल आरोपींच्या जामीनावर आता १८ रोजी सुनावणी

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

औरंगाबाद प्रतिनिधी । घरकूल संशयितांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या जामीनावर आता १८ रोजी सुनावणी होणार आहे.

घरकूल प्रकरणातील संशयितांना शिक्षा आणि दंड झालेले आहेत. यातील २८ आरोपींनी जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आहे. या सर्वांच्या अर्जावर आज अर्थात १६ रोजी सुनावणी होणार होती. यानुसार आज सकाळी न्या. नलावडे यांच्यासमोर सुनावणी झाली असता यावर आता १८ रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घरकुल प्रकरणी कारागृहात असणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासाठी आगामी निवडणूक महत्वाची आहे. दोन्ही मान्यवर निवडणूक लढवू शकणार नसले तरी आपल्या घरातील सदस्यांसाठी ते स्वत: मैदानात उतरल्यास त्यांना राजकीय लाभ होऊ शकतो. या पार्श्‍वभूमिवर, आजदेखील तारीख पुढे ढकलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांची निराशा झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content