Home क्राईम घरासमोरून एकाची दुचाकी मध्यरात्री लांबविली

घरासमोरून एकाची दुचाकी मध्यरात्री लांबविली

0
45
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बोरगाव येथील एकाची दुचाकी मध्यरात्री घरासमोरून चोरून नेल्याची उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या माहितीनुसार, अनिल रामदास निकम (वय-४५) रा. हिरापूर ता. चाळीसगाव ते काही कारणास्तव धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथे त्याचे नातेवाईक महेश निंबा मराठे यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी (एमएच १९ एन ४४२८) त्यांच्या घरासमोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून २० हजार रुपये किमतीचे दुचाकी चोरून नेल्याची उघडकीला आले. याबाबत त्यांनी परिसरात शोधाशोध केली, परंतु तिथे कुठेही आढळून आलेले आहे. अखेर त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दीपक पाटील करत आहे.


Protected Content

Play sound