जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील घनशामनगरात घरासमोर उभी ७० हजार रुपये किंमतीची रिक्षा चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घनशाम नगरात मानवशाळेजवळ सुनील ऊर्फ एकनाथ अंबिकार वय ५२ हे वास्तव्यास आहेत. ते रिक्षाचालक असून रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह भागवितात. १९ एप्रिल रोजी सुनील अंबिकार यांनी नेहमीप्रमाणे रात्री त्यांची एम.एच. १९ सीडब्लू ०५५६ या क्रमांकाची रिक्षा घरासमोर उभी केली. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बाहेर जाण्यासाठी निघाले असता, घरासमोर रिक्षा मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही रिक्षा मिळून न आल्याने सुनील अंबिकार यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली.त्यावरुन तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर करीत आहेत.