जळगाव प्रतिनिधी । समता नगरातील एका घरात चोरी करून सोने चांदी आणि रोकड असे एकून 2 लाख 75 हजार रूपयांचा ऐवज नेल्याचा प्रकार झाला होता. या घटनेतील चार सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की, समता नगरातील रहिवाशी भागवत ओंकार अहिरे रा. वंजारी टेकडी, मरीमाता मंदीरामागे, समता नगर हे 25 मार्च ते 26 मार्च 2018 रोजी काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेत चार चोरट्यांनी घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख रूपये रोख, 78 भार चांदी, 15 ग्रॅमची सोन्याची चैन, 10 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या आणि 5 ग्रॅम वजनाचे कानातले टोंगल असे एकून 2 लाख 79 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेबाबत भागवत अहिरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडी करून चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील सराईत गुन्हेगार व कार्यरत असलेल्या आरोपींतांची कसुन चौकशी केली असता या गुन्ह्यातील आरोपी राहूल नवल काकडे वय-20, बबलु रविंद्र सपकाळे वय-26, किरण किशोर गोटे वय-19 आणि बापु भावलाल सोनवणे वय-22 सर्व रा. समता नगर यांची कसून चौकशी केली असता समता नगरात केलेल्या घरफोडीची कबुली दिली असून चोरीपैकी 30 ग्रॅम सोन्याचे दागीने आणि तीस हजार रूपये रोख रक्कत जप्त केली आहे. यातील राहूल नवल काकडे हा हद्दपार आरोपी असून हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघ केल्याप्रकरणी रामानंद नगरला दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले आणि अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापु रोहम यांनी एलसीबीचे पोलीस पथकात सपोनि महेश जानकर, सफौ मनोहर देशमुख, पोकॉ रामचंद्र बोरसे दादाभाऊ पाटील रविंद्र पाटील विजय पाटील श्रावण पगारे, विकास वाघ, नरेंद्र वारूळे, प्रकाश महाजन, गफुर तडवी, किरण चौधरी, हरिष परदेशी, रविंद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, विनायक पाटील, दत्तात्रय बडगुजर, रविंद्र चौधरी, प्रविण हिवराळे, दिपक पाटील अशांचे पथक तयार केले.