यावल (प्रतिनिधी) भारतातील निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमद्वारे पारदर्शकपणे होत नसल्याचा आरोप करीत भारिप बहुजन महासंघाच्या तालुका शाखेच्या वतीने आज (दि.१७) येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आले.
भारिपव्दारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृद्ध आहे. जगातील अनेक लोकशाही असलेल्या देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली आहे. परंतू दुसरीकडे आपल्या भारत देशात ईव्हीएमला जास्त महत्त्व दिले जाते. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्यात ईव्हीएमचा गोंधळ दिसून आला. अकोला व इतर मतदार संघात झालेले मतदान व मतमोजणीच्या आकड्यांचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून आले आहे.
यामुळे लोकशाहीचा गळा दाबल्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती व ग्रामपंचायत या सर्वांची मतदानाची निवडणूक प्रक्रिया ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन यावल तहसिलदार जितेंद्र कुंवर यांना देण्यात आले. या निवेदनावर भारीप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मनोज कापडे , युवा तालुकाध्यक्ष सचिन बाऱ्हे , जिल्हा सचिव दीपक मेघे, कमलाकर बोदडे ,सोनू वाघुळदे, दिनकर तायडे ,अश्विन तायडे, हर्षल मेघे, अमोल तायडे ,सुजित मेघे, आकाश मेघे, विकास मेघे, संगीता मेघे, मीनाक्षी आढाळे, वैशाली तायडे, जिजाबाई मेघे, मिराबाई तायडे, उषा तायडे, रेखा तायडे, धीरज मेघे, अलका आढाळे यांच्यासह भारिप बहुजन महासंघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.