रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अप डाऊनमुळे आणि सोयीच्या वेळेवर येत नसल्याने रूग्णांची मोठी अडचण निर्माण होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी रूग्णाकडून केली जात आहे.
रावेर ग्रामीण रूग्णालयात तालुक्यातील रूग्ण मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतू येथील कर्मचारी, परिचारीका व शिपाई सोईच्या ठिकाणावरून अपडाऊन करत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. ग्रामीण रूग्णालयाने आखून दिलेल्या नियम व वेळेची चांगलीच पायमल्ली केली जात आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, रावेर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांची बदली झाल्यापासून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची काम करण्याची शिस्त बिघडली आहे. त्यामुळे रूग्णांना वेळेवर सेवा मिळावी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी रूग्णांकडून केली जात आहे.