‘ही’ इलेक्ट्रीक स्कूटर घ्या; लायसन्सची गरज नाही !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी झेलिओ ई मोबिलिटीने नव्या ‘लिटिल ग्रेसी’ नॉन-आरटीओ इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँचिंग केले आहे. विशेषतः १० ते १८ वयोगटातील तरुण रायडर्ससाठी ही स्कूटर डिझाइन करण्यात आली असून, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि आकर्षक डिझाइनवर भर देण्यात आला आहे. ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसल्याने ही स्कूटर विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त पर्याय ठरू शकते. लिटिल ग्रेसी तीन वेगवेगळ्या बॅटरी ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरची किंमत ४९,५०० रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

४८व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरी – ₹४९,५००, रेंज: ५५-६० किमी, चार्जिंग वेळ: ७-८ तास
६०व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरी – ₹५२,०००, रेंज: ७० किमी, चार्जिंग वेळ: ७-९ तास
६०व्ही/३०एएच लीथियम-आयन बॅटरी – ₹५८,०००, रेंज: ७०-७५ किमी, चार्जिंग वेळ: ८-९ तास

झेलिओ ई मोबिलिटी लिमिटेडचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणाले, “लिटिल ग्रेसीच्या लाँचिंगसह, आम्ही असे उत्पादन सादर करत आहोत, जे तरुण रायडर्ससाठी केवळ स्टायलिश आणि क्रियाशील नसून, टिकाऊ आणि स्वस्त पर्याय देखील आहे. आमचे ध्येय भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीला दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे आहे.”

तांत्रिक वैशिष्ट्ये व आधुनिक सुविधा
BLDC मोटर: ४८/६०व्ही बीएलडीसी मोटर
लोडिंग क्षमता: ८० किलो
कमाल वेग: २५ कि.मी./तास
वीज वापर: प्रति चार्ज १.५ युनिट
विशेष फीचर्स: डिजिटल मीटर, यूएसबी पोर्ट, चावीविरहित ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो-रिपेअर स्विच
ब्रेकींग सिस्टीम: हायड्रॉलिक सस्पेंशन, ड्रम ब्रेक्स
रंग पर्याय: गुलाबी, तपकिरी/क्रीम, पांढरा/निळा, पिवळा/हिरवा

झेलिओ ई मोबिलिटीने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेत मोठी भरारी घेतली आहे. २,००,००० हून अधिक ग्राहक आणि ४०० पेक्षा जास्त डीलरशिपसह, हा ब्रँड वेगाने विस्तारत आहे. कंपनीकडून लिटिल ग्रेसीच्या मोटर, कंट्रोलर आणि फ्रेमवर दोन वर्षांची वॉरंटी दिली जाते. झेलिओ ई मोबिलिटीच्या या नव्या स्कूटरमुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Protected Content