जळगाव प्रतिनिधी । गीतेमुळे आपले व्यक्तिमत्व विकास होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण गीता पाठांतर करायला हवी .गीतेला योग्य रीतीने समजून घेऊन तिचे योग्यरित्या आचरण हे आपल्या आयुष्यात करायला हवे. गीतेमधील प्रत्येक श्लोकाचे ग्रहण प्रत्येकाने करायला हवे त्यामुळे आयुष्याला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन रविंद्र गुर्जर यांनी व्यक्त केले पाहिजे.
या जगातील प्रत्येकापर्यंत गीतेचा सार पोहचायला हवा यासाठी तिचे 200 भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. प्रत्येक व्यक्तीने गीता समजून घेतली तर मानव जातीचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान आणि के.सी.ई. सोसायटी संचलित शालेय विभाग द्वारा गीता पठण स्पर्धा व ओजस्विनी कला महाविद्यालय आयोजित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रवींद्र गुर्जर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किसन पाटील, बेंडाळे प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष शशिकांत वडोदकर, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, प्रा. रेखा मुजुमदार, शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, बेंडाळे प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य ए.आर.राणे ,मनोज जागींड मंचावर उपस्थित होते. अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे सदस्य सुधीर बेंडाळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद स्वीकारले. यावेळी मंचावरील मान्यवरांनी होम प्रज्वलन करून गीतापठण स्पर्धेचे उदघाटन केले.यानंतर अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किसान पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना सुरुवातीला अण्णासाहेब बेंडाळे यांना अभिवादन केले.
त्यानंतर ते पुढे बोलता म्हटले की, गीता फक्त पाठ करू नका.तिचे योग्य रीतीने अध्ययन करा,अभ्यास करा आणि पिंपळ व वडासारखे मोठे होऊन इतरांना सावली द्या. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद म्हणजे गीता. जो गीता ग्रहण करतो.तो स्वतःला ओळखतो. गीतेच्या माध्यमातून स्वत:चा आत्मोधार करता येतो .तसेच भक्तियोग ,कर्मयोग या गोष्टी साध्य करता येतात. यावेळी अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानला भरीव मदत करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ.किसन पाटील यांनी साने गुरुजी कथामाला सुरु राहण्यासाठी ५१ हजार रुपयांचा चेक दिला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी २५ हजार व मनोज जांगिड यांनी २१ हजार रुपये बेंडाळे प्रतिष्ठानला दिले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक बेंडाळे प्रतिष्ठानचे सचिव ए.आर.राणे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे रविंद्र गुर्जर यांचा परिचय चंद्रकांत भंडारी यांनी करून दिला. गीता पठन स्पर्धेसाठी शहरी आणि ग्रामीण असे दोन गट करण्यात आले होते. स्पर्धेसाठी वेगवेगळ्या वर्गखोल्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वर्गाला संत तुकाराम, संत एकनाथ, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस या थोर महापुरुषांची नावे देण्यात आली होती. चित्रकला स्पर्धेत २०० पेक्षा जास्त विद्यार्थांनी सहभाग घेतला. या चित्रकला स्पर्धत लहान, मोठा व खुला गट होता. या चित्रकला स्पर्धेसाठी लहान गटासाठी श्रीकृष्ण जीवनातील प्रसंग व मोठ्या गटासाठी श्रीमद्भगवद्गीतातील प्रसंग हे विषय होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता झांबरे तर आभार डॉ.सुनिता ढाके यांनी आभार व्यक्त केले. तसेच शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थिती होते.