पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंबई उच्च न्यायालयाच्या स्वीय सहाय्यक गट (अ) राजपत्रित अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात पाचोऱ्यातील गायत्री राजेंद्र शिंपी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
पाचोरा येथील रहीवासी असलेले मंजुषा व राजेंद्र माधवराव शिंपी (मांडगे) यांची कन्या गायत्री राजेंद्र शिंपी यांनी उच्च न्यायालयाच्या स्वीय सहाय्यक गट (अ) राजपत्रित अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात अभिनंदन होत आहे.