दगडी चाळीतील कार्यकर्ते शिंदे यांच्यासोबत !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डॉन अरूण गवळी यांच्या भावासह दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशीरा शिवसेनेत प्रवेश घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी काल रात्री मुंबईच्या भायखळ्यातील प्रसिद्ध असलेल्या दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून याबाबत टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. यानुसार, डॉन अरुण गवळी यांचा भाऊ प्रदिप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या उपस्थितीत दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

अरूण गवळी यांनी आधी विधानसभेत प्रतिनिधीत्व केले असून त्यांची पत्नी आणि कन्या यांनी नगरसेविकपद भूषविले आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता असून या पार्श्‍वभूमिवर, दगडी चाळीतून शिवसेनेत झालेली इनकमींग महत्वाची मानली जात आहे.

Protected Content