सावदा, ता.रावेर, जितेंद्र कुलकर्णी | सालाबादाप्रमाणे माघ शुद्ध पौर्णिमेला होणारा गावंजी बुवा महाराज यांचा यात्रोत्सव सावखेडा येथे संपन्न होत आहे. १२८ वर्षांची अखंड परंपरा असलेल्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
गावंजी बुवा महाराज या देवस्थानाची इच्छापूर्ती करणारे देवस्थान अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. यात्रेच्या आठ ते दहा दिवसांपासून मंदिरांना रंगरंगोटी केली जाते. तर यात्रेच्या दिवशी देवकाठीची मोठी वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. त्या दिवशी प्रथम देवकाठीचे स्नान करून नवीन कपडे व ध्वज चढवून देवकाठीचे नूतनीकरण करण्यात येते .यात्रेच्या दिवशी पाळणे, खेळणी, मिठाईचे दुकाने,बांगड्यांची दुकाने सावखेडा गावात थाटण्यात येतात.
या ठिकाणी सुपडू बुवा महाराज, दगडू बुवा महाराज, लक्ष्मण बुवा महाराज, शितलामाता मंदिर ,मरी माता मंदिर, रामभाऊ महाराज मंदिर आदी.मंदिरे आहेत. येथे तालुक्यातूनच नाही तर विविध जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत असतात.
गावंजी बुवा महाराजांचा इतिहास असा सांगितला जातो तो म्हणजे “गावंजी बुवा महाराज हे पाच भावंडे होते. पहिले गावंजी बुवा महाराज तर दुसरे काम सिद्ध महाराज रोझोदा यांची याच दिवशी ‘रोझोदा’ येथे यात्रा भरते. तिसरे लुकडूजी महाराज (कोचुर), चौथे आमोशिक महाराज (डोलारखेडा), पाचवे सुभान महाराज (नाझिगरा) होय. अशा पाच बंधूंचा इतिहास सांगितला जातो. या पाचही बंधूंचे त्या त्या ठिकाणी मंदिरे आहेत .या यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण मंडळी, ग्रामस्थ सहभागी होऊन मोठी कार्य करतात.
व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2327986484006685