चैतन्य तांडा ग्रामपंचायतीतर्फे अंगणवाडीस गॅस कनेक्शन

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांड्यात आज सरपंच अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभा घेण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेता ग्राम निधीतून येथील अंगणवाडीस गॅस कनेक्शनासाठी रक्कम वितरीत करण्यात आला.

 

चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायत हे विविध विकासकामांमुळे नेहमी चर्चित असते. ग्रामस्थांना प्राथमिक सोयीसुविधा मिळावे यासाठी ग्रामपंचायत नेहमी तत्पर राहते. दरम्यान आज शुक्रवार रोजी ग्रामपंचायतीत महिला ग्रामसभा सरपंच अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी महिलांच्या सबलीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. व अंगणवाडीत गॅस नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. अशात ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामनिधीतून साडेसहा हजार रुपये सुपूर्द केले. यामुळे आता अंगणवाडीत गॅस कनेक्शन मिळणार आहे.

 

यावेळी सरपंच अनिता राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्या अनिता चव्हाण, यशोदा चव्हाण, गीता राठोड, वसंत राठोड व उदल पवार पदम तवर, ममराज राठोड, देवसिंग राठोड, भावलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, संतोष चव्हाण व महिला ह्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Protected Content