शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील अप्पासाहेब र.भा.गरूड महाविद्यालय आणि आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. यात बारावीचा कला महाविद्यालयाचा निकाल ९४.२६% लागला असून विज्ञान विभागाचा निकाल १०० % लागला आहे.
या निकालात विज्ञान महाविद्यालय
प्रथम क्रमांक – कुलकर्णी हर्षदा प्रमोद ७७.५०%
द्वितीय क्रमांक – जोशी सिध्दी गजानन ७६.३०%
तृतीय क्रमांक – नाईक राणी नवल ७५.१६%
१२ वाणिज्य महाविद्यालय निकाल ९९.१९% लागला आहे.
यात प्रथम क्रमांक – चौधरी वैष्णवी धनंजय ८२.१७%
द्वितीय – नाथ वैष्णवी संजय ७६%
दुसाने रामप्रसाद गोपाल ७६%
राठोड रेशम मुरलीधर ७६%
तृतीय क्रमांक – नाईक बबन रतीलाल ७५.३३ %
आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान विभागाचा निकाल १००% लागला आहे.
किमान कौशल्य विभागाचा निकाल ९८.२१% लागला असून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी विज्ञान विभागाचे २३७ विद्यार्थी प्रविष्ट होते. तर किमान कौशल्य विभागाचे ५६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते. विज्ञान विभागाच २३७ पैकी ५६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर १७० विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.
विज्ञान विभागातून बारी पायल गणेश ही विद्यार्थिनी प्रथम आली असून हिला ८५.६७ % गुण प्राप्त झाले आहेत; तर द्वितीय भावसार राणी संजीव या विद्यार्थिनीला ८५% % मिळाले आहेत. तृतीय जैन भावीक शैलेश यास ८३.१७ % मिळाले.
किमान कौशल्य विभागाचा विद्यार्थी राठोड जगदीश इंदल हा प्रथम आला असून याला ७७.१७% गुण मिळाले आहेत. द्वितीय नाईक स्वप्निल प्रकाश याला ७३.८३ % गुण मिळाले. गवळे वनिता दिलीप ही तृतीय आली असून ७२% मिळाले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, संस्थेचे सचिव सतीश काशीद, संस्थेचे सचिव दीपक गरुड, संस्थेच्या महिला संचालिका उज्वलाताई काशीद, वस्तीगृह सचिव कैलास देशमुख शाळेचे मुख्याध्यापक एस पी उदार उपमुख्याध्यापक ए बी ठोके सर्व विज्ञान विभाग व किमान कौशल्य विभाग प्राध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.