चोपडा प्रतिनिधी । शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना माजी आमदार व तापी सूतगिरणीचे चेअरमन कैलास पाटील व मित्र मंडळातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी माजी आ.कैलास पाटील, सूतगिरणी संचालक तुकाराम पाटील, चो.सा.का.संचालक भरत पाटील, संजय बोरसे, रमाकांत बोरसे, माजी तालुका शिवसेना प्रमुख देवेंद्र सोनवणे, शेतकरी संघ संचालक सुनिल पाटील, रामचंद्र भांदले, उपेंद्र पाटील, महेंद्र भोई, शशीकांत कन्हैये, सुनील बडगुजर, चंद्रकांत महाजन, रविंद्र पाटील, भैय्या धनगर, दिपक चव्हाण व बाळराजे ग्रुपचे अध्यक्ष मनोहर पाटील आणि सर्व कार्यकर्ते हे उपस्थितीत होते. माजी आ.पाटील यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे समाजाकडून कौतुक केले जात आहे.