गँगस्टर अरूण गवळी यांची सुटका होणार; नागपूर खंडपीठाने दिला आदेश

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कुख्यात गॅगस्टर अरूण गवळी यांची तुरूंगातून मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. हा आदेश नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला आहे. मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणासह इतर गुन्हेगारी कृत्य केल्याप्रकरणी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

सध्या अरुण गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारवर डॉन अरूण गवळी यांनी शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरूण गवळी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. आता तुरंग प्रशासन यावर काय निर्णय देणार हे महत्वाचे आहे.

Protected Content