नोएडा (वृत्तसंस्था) नोकरी शोधत असलेल्या एका तरुणीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक नोएडामध्ये घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी चार संशयिताना अटक केली आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या पिडीत तरुणीची एका कंपनीतील रवी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्यावेळी रवीने तरुणीला नोकरी मिळवून देण्याचे आश्वसन दिले. बुधवारी संध्याकाळी या तरुणाने तरुणीकडे नोकरीसाठी काही कागदपत्रांची विचारणा केली. ती कागदपत्र आपल्याजवळ असल्याचे तिने सांगितल्यानंतर तरुणाने तिला संध्याकाळीच सगळे कागदपत्र घेऊन एका पार्कमध्ये भेटण्यास बोलवले. त्यांतर दोघं जण त्या ठिकाणी बोलत असतांना दोन तरुण अचानक तिथे आले आणि त्यांनी तरुणीला छेडण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी युवतीसोबत असलेल्या तरुणाला धमकी देऊन तिथून हाकलून लावले आणि त्यांतर आपल्या आणखी चार मित्रांना बोलावून घेतले. सहाही जणांना नंतर पार्कजवळील एका निर्जन शेतात नेऊन या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.