रांची-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक वृत्तांत असा आहे की महिला आणि तिचा पती झारखंडमधील दुमका येथे पर्यटनासाठी आले होते. येथे सात जणांनी मिळून त्या परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान आरोपीनी तिच्या पतीचे हात-पाय बांधून ठेवले होते.
हे कृत्य करताना त्या आरोपीनी महिलेला लाथा, बुक्क्यांनी मारहाण ही केली. पीडित महिलेच्या कायदेशीर मदतीसाठी स्वतंत्र टीम बनवण्यात आली आहे. पीडित महिला स्पेनची नागरिक आहे. रविवारपर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दुमका पोलिसांनी दिली. झारखंडमधल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
नवऱ्याचे हात-पाय बांधून परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार
1 year ago
No Comments