शेगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्याकडून ‘शेगाव’ शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात आली असून त्यांच्याकडून एक, दोन नव्हे तर तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला शेगाव शहर व परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरट्यांची टोळी ‘शेगाव’ येथीलच असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाच्या पथकाने शुक्रवार, दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळपासून सापळा रचून शेगाव शेगावातील पाच शहरातून व परिसरातून एकूण सतरा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या चोरीच्या प्रकरणातील म्होरक्या व इतर चोरट्यांना ताब्यात घेऊन आणखी कुठे आणि किती चोरीच्या चोरीच्या घटना घडविण्यात आल्या याबाबत विचारपूस करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणावरून चोरीच्या १७ विना नंबरचे दुचाकी जप्त करून शेगाव पोलीस स्टेशन आवारात जमा केल्या. अजूनही चोरी झालेली काही दुचाकी वाहने पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/659844488495448