गणरायाला सर्वत्र भावपूर्ण निरोप

जळगाव प्रतिनिधी । दहा दिवसांपासून चैतन्याचे वातावरण निर्मित करणार्‍या श्री गणेशाला सगळीकडे भावपूर्ण निरोप देण्यात आला. रात्री उशीरापर्यंत विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

या वर्षाच्या गणेशोत्सववावर पावसाचे सावट असले तरी सगळीकडे गणेशभक्तांच्या उत्साहात कोणतीही कमतरता जाणवली नाही. दरम्यान अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासून विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. घरगुती आणि खासगी या दोन्ही प्रकारांमधील गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. जळगावसह भुसावळ, चाळीसगाव, फैजपूर, रावेर आदी प्रमुख शहरांमधील सार्वजनीक गणेश मंडळाच्या मिरवणुकांमध्ये हजारो भाविक सहभागी झाले. ठिकठिकाणी गणेशभक्तांनी वाजंत्रीच्या तालावर धमाल नृत्य केला. रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. यानंतर गणरायाला जड अंतकरणाने निरोप देण्यात आला.

Protected Content