जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परीसरात आज महानगरपालिकेच्या वतीने रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यात रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी दुतर्फा बनविण्याच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. यात गणेश कॉलनी परीसरातील काही भागांमध्येही दुतर्फाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. दरम्यान या भागात रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.
रिंगरोड ते गणेश कॉलनीपर्यंत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दुतर्फाची कामे सुरू होती. नुकतेच या कामांना पुर्णत्वास आली होती. यादरम्यान वाहनचालकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले होते. तसेच याच रस्त्यावर शाळा व महाविद्यालये असल्याने वाहनांची वार्दळ मोठ्या प्रमाणावर राहते.