येडियुरप्पा आज संध्याकाळी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

karnatak

बंगळुरू वृत्तसंस्था । कर्नाटकमध्ये कुमारस्वामीचं सरकार पडल्यानंतर नव्या सरकार स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. या भेटीदरम्यान येडियुरप्पा हे सरकार स्थापनेचा दावा केला असून, आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपालांची भेट घेऊन येडियुरप्पा त्यांना 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र सोपवले, तसेत त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, येडियुरप्पा हेच भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा हे करतील. परंतू, कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार स्थापन करण्याची संधी मिळाल्यास भाजप नेते येडियुरप्पा यांना त्यासाठी कसरत करावी लागणार आहेत. भाजप आमदारांपैकी ५६ ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रीपद हवे आहे. त्याशिवाय १५ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना महत्त्वाची पदे द्यावी लागतील.

 

Protected Content