सजग नागरीक संघाची गांधीगिरी ; मुख्याधिकारींच्या खुर्चीला घातला हार

221866bb a17f 462a 82fb ed474f9b6f99

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील सजग नागरीक संघाच्या वतीने गांधीगिरीच्या मार्गाने नगरपरिषद कार्यालयात जाऊन आज अनोखे आंदोलन करण्यात आले. यात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला प्रतिकात्मक हार घालण्यात आला. मागील ५ ते ६ महिन्यापासून मुख्याधिकारी नाहीय.

 

नगरपरिषदेत गेल्या ५ ते ६ महिन्यापासून मुख्याधिकारी नसल्यामुळे दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत. यात प्रामुख्याने आरोग्य,स्वच्छतेचा प्रश्न शहरवासियांना भेडसावत आहे. पालिकेत मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामांचे नियोजन कोलमडलेय. याबाबत सजग नागरीक संघाच्या वतीने यापूर्वी समस्यांचे निवेदन दिलेले होते. यातील काही समस्या मार्गी लागल्यात तर काही समस्या ‘जैसे थे’ त्याच स्थितीत आहे. नागरीकांना आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अनेक प्रशासकीय योजना खोंळबल्या आहेत.

यासाठी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण,नगराध्यक्षा आशालता चव्हाण,उपाध्यक्षा आशाबाई चव्हाण,गटनेते संजय पाटील,विरोधी गटनेते राजीव देशमुख यांनी तातडीने जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करुन चाळीसगाव नगरपरिषदेस मुख्याधिकारी मिळवावा अशी मागणी यावेळी सजग नागरीक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. आंदोलनाच्यावेळी गणेश पवार,दिलीप घोरपडे,उदय पवार,मुराद पटेल,स्वप्नील कोतकर,तमाल देशमुख,एकनाथ सोमवंशी,कुणाल कुमावत,खुशाल पाटील,सागर नागणे, दिपक पाटील,दिलीप सोनार,हरेश जैन,गणेश पाटील,अक्षय देशमुख,श्रीकांत भामरे आदी उपस्थित होते.

Protected Content