नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ ‘गांधीधाम एक्स्प्रेस’ला लागली आग

नंदुरबार प्रतिनिधी | नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी ‘गांधीधाम एक्स्प्रेस’ला आग अचानक लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर अद्याप कुठलीही जीवित हानी झालेली नाही.मात्र बऱ्याच वेळेसाठी रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता

‘बर्निंग ट्रेन’ या चित्रपटातील आगीने वेढलेल्या डब्यातील साहस दृध्ये अनेकांनी पाहिली आहेत पण प्रत्यक्ष जीवनात त्याचा अनुभव घेण्याची कल्पना देखील करू शकत नाही. मात्र असाच काहीसा अनुभव आज ‘गांधीधाम एक्स्प्रेस’मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आला.

नंदुरबार रेल्वे स्थानक हाकेच्या अंतरावर असताना पुरीच्या दिशेनं निघालेल्या ‘गांधीधाम एक्स्प्रेस’ला आग अचानक लागली. पॅन्ट्री बोगीला लागलेली आग एसी बोगीपर्यंत पसरली. बघता बघता रेल्वेच्या खिडक्या आणि छतांमधून आगीच्या ज्वाला बाहेर डोकावू लागल्या. त्यामुळं प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.

या रेल्वेत काही क्षणांसाठी क्षणार्धात आग लागली आणि खिडकी, दरवाजा, छतावरून धुरांचे लोट बाहेर पडू लागले. वेळीच रेल्वे थांबवत प्रवाशांना बाहेर काढत आगीची डबे बदलण्यात आल्याने होणारा अनर्थ टळला असून या आगीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि भविष्यात तशी जोखीम पत्करावी लागू नये यासाठी कारणे शोधून त्यावर वेळीच उपाय उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे अशी प्रवाशांची भावना होती.

 

Protected Content