राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणीसह लसीकरण मोहीम (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने आज शहरातील रामेश्वर कॉलनी आदित्य चौक येथे राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणी मोहीम व लसीकरण शिबिराचे आयोजन राष्ट्रवादीचे महानगर उपाध्यक्ष यशवंत पाटील व  राष्ट्रवादीचे महानगर सरचिटणीस विशाल देशमुख यांच्या नेतृत्वात  करण्यात आले होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचावा व जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर वन व्हावा याच उद्देशाने या सदस्य नोंदणी मोहिमेचा आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या हस्ते सदस्यता नोंदणी अभियानास व १५ ते १८ वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी कोविड लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी , ओबीसी सेलच्या जिल्हाअघ्य अश्विनी देशमुख , अल्पसंख्याक जिल्हाअघ्यक्ष मजहर पठाण , शहर संघटक राजु मोरे , सरचिटणीस सुनीलभैय्या माळी , उपाध्यक्ष अमोल कोल्हे, किरण राजपूत, सरचिटणीस रहीम तडवी, जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षी चव्हाण , अॅड. सचिन पाटील, सुशील शिंदे, संजय जाधव, संजय हरणे, जितू बागरे, शहर कार्यलय मंत्री राहुल टोके आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महानगर उपाध्यक्ष यशवंत पाटील व जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी रामेश्वर कॉलनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी
या सदस्य नोदणी अभियानात २०३ सदस्य नोदणी झाली व १५ ते १८ वयोगटातील युवक युवतीसाठी मोफत लसीकरण मोहीमेत १८० सहभाग घेऊन लसीकरण करण्यात आले. यावेळी अँड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोदणी करताना गरीब होतकरु नागरिकांना ज्याकाही आडचणी असती तहसील कचेरी , सिव्हिल हाँस्पिटल , विधवा महिला साटी पगाराबाबत रेशन धान्य दुकान बारकोड बाबत काही समस्या असल्यास त्या सोडून दिल्या पाहिजे असे आवाहन सदस्य नोंदणी अभियान निमित्ताने केले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/692322181771949

Protected Content