यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी महेश संजय अहिरे याने शैक्षणिक वर्ष 2021-22 या कालावधी गांधी विचार संस्कार परीक्षेत जळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजव्दारे संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व गांधी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी विचार संस्कार’ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत वर्तमान काळात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या उद्देशाने ही संस्कार परीक्षा घेण्यात आली होती.
महेश अहिरे या विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशा बद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी त्याचा सिल्वर मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव सत्कार केला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. एम. डी. खैरनार उपप्राचार्य ए. पी. पाटील विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. एस. पी. कापडे, डॉ. सुधा खराटे, डॉ. पी. व्ही. पावरा प्रा. मयूर सोनवणे व मिलिंद बोरघडे शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. महेश अहिरे या विद्यार्थ्याने मिळवलेल्या या परीक्षेतील लक्ष वेधणाऱ्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौत्तुक होत आहे.