जयपूर वृत्तसंस्था । राहुल गांधी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब ‘पार्ट टाईम’ राजकारण करतात आणि त्यांना तसेच अशोक यांना शेतकर्यांशी काही देणं घेणं नाही अशी खोचक टीका राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आठ तारखेला होत असलेल्या शेतकर्यांच्या भारत बंदचे समर्थन केलं आहे. या पार्श्वभूमिवर, सतीश पुनीया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, यावेळी भारत बंद नाही, तर भारत खुला होण्याची आवश्यकता आहे, असे पूनिया म्हणाले. जगात खुल्या मनाने, खुला भारत नवा भारत आणि प्रगतीच्या मार्गावर चालावा यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी हे शेतकर्यांचे समर्थक असल्याचं म्हटलं आहे आणि शेतकर्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केल्याचं विधान गेहलोत यांनी केलं आहे.
पुनीया पुढे म्हणाले की, राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब पार्टटाईम राजकारण करत आहेत. त्यांना शेतकर्यांशी काहीही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही शेतकर्यांचं काहीही पडलेलं नाही असं भाजपाच्या सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे. तसेच राजस्थानात शेतकर्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर काँग्रेसला खरंच शेतकर्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकर्यांची दखल घ्यावी असं देखील म्हटलं आहे.