भवरखेडा वीस वर्षीय तरूणी बेपत्ता; धरणगाव पोलीसात नोंद

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भवरखेडा येथील वीस वर्षीय तरूणी काहीही न सांगता बेपत्ता झाल्याचे शनिवारी सायंकाळी समोर आले आहे. तरूणीच्या काका यांच्या खबरीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील रहिवाशी जोत्स्ना संजय पाटील (वय-२०) ही तरूणी घरकाम व शिवण काम करते. शनिवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घरात कुणालाही काहीही न सांगात बेपत्ता झाली. तीचा नातेवाईक आणि मैत्रिणींकडे शोधाशोध केली असता मिळून आली नाही. याप्रकरणी तरूणीचा काका यांच्या खबरीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक कपील पाटील करीत आहे.

Protected Content