रावेर, प्रतिनिधी | येथील ग्रामदैवत पाराचा गणपती मंदिरात सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील व मान्यवर यांच्या हस्ते विधीवत पूजन व आरती करून विसर्जन मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. या मिरवणुकीत आ. हरीभाऊ जावळे,उद्योजक श्रीराम पाटिल यांनी देखील सहभाग घेतला होता.
पुष्पमाळा, विद्युत रोषणाईने सजविलेल्या ट्रॅक्टर वर श्री गणरायांच्या मुर्ती ठेवुन शहरातील गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झालेली होती. आकर्षक वेषभुषेतील व ढोल ताशांच्या तालावर लयबध्द रित्या लेझीम खेळणारी व्यायाम शाळांची लेझीम पथके मिरवणुकीचे खास आकर्षण होते.शहरातील प्रमुख मार्गावरुन ही मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये शिवाज्ञा व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी लेझिम नृत्य सादर करत रावेरकरांचे मन जिंकले. भोई वाडा गणेश मंडळाने ढोल-ताशे वाजवित परीसर दणाणुन सोडला होता. यावेळी यांच्या संभाजी व्यायाम शाळा महात्मा फूले व्यायाम शाळा सत्यशोधक महात्मा फुले व्यायाम शाळा यांच्यासह अनेक गणेश मंडळ मोठ्या संखने सहभागी झाले होते. बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुर्फता भाविकांची मोठी गर्दी केली होती. शहरातील नागझीरी कुंडाजवळ आरती होऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. तालुक्यातील अभोडा धरण व तापी नदी येथे बाप्पास भावपुर्ण निरोप देण्यात येवुन विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत तहसीलदार उषाराणी देवगुणे, शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, उपनगराध्यक्ष असदुल्ला खान, नगरसेवक राजेंद्र महाजन, शे. सादिक, जगदिश घेटे, अशोक शिंदे, शे.गयास, संजय वाणी, सुरेश शिंदे, उमेश महाजन, मुन्ना अग्रवाल, युसुफ खान, पो.पा.लक्ष्मीकांत लोहार, निलेश पाटील, शैलेंद्र अग्रवाल यांच्यासह शांतता समीती सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहा.पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
रावेरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझिम नृत्य सादर करतांना शिवाज्ञा व्यायाम शाळेचे खेळाडू :- बघा व्हिडिओ