यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोरपावली येथे फैजपुर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने झन्नामन्ना जुगार खेळतांना चार जणांवर कार्यवाही करण्यात आली आहे. या घोळात जमलेल्या जुगाऱ खेळणाऱ्यांच्या चार महागडया दुचाकी, दुचाकी वाहन मोबाइल फोन व ६o हजार रूपये जुगाराच्या साहित्यासह सुमारे अडीच लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल तालुक्यातील कोरपावली या गावात दिनांक १० एप्रील गुरूवार रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील यावल चे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने कार्यवाही करीत कोरपावली शेत शिवारातील अजीज शमशेर तडवी यांच्या मक्कयाच्या शेतात कमलेश आत्माराम पाटील राहणार जळगाव , अजीज शमशेर तडवी राहणार कोरपावली तालुका यावल,हुसैन खान अख्तर खान राहणार यावल,तुषार दिलीप तायडे या मंडळीने स्वताच्या फायद्यासाठी गैरकायद्याने झन्नामन्ना हा हारजितचा पत्ता जुगार खेळतांना मिळून आलेत त्यांच्या विरूद्ध पोहेकॉ गणेश प्रल्हाद मनुरे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार दुचाकी मोटरसायकलसह २५ हजार रूपये किमतीचे दोन मोबाइल व झाडाझडतीत सुमारे २० हजार रूपये रोख आणी ५२ पानी पत्ता जप्त करण्यात आले आहे.