धरणगावात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ !

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील सोनवड रोडच्या डाव्या बाजूला एका शेतातील विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सध्या सर्वत्र  शेती चे  कामे जोरात सुरू असून संबंधित शेतात काही दिवसांपूर्वी मक्का पिकांची काढणी होऊन काम संपल्याने शेत  मालक दोन तीन दिवस शेतमजूर पाणी घेण्याची विहिरीवर गेल्यामुळे संबंधित घटक उघडकीस आली. त्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्यात तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस बांधवांनी स्थानिक लोकांच्या  मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पुढील  तपास पो. नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस कर्मचारी  करीत असुन मृददेहाचा उजव्या  हातावर  आकाश नाव गोंदण केलेले असुन  अंगात  चौकडीचा निळ शर्ट व काळी पॅन्ट असुन सदर ओळख पटविण्याचे आव्हान धरणगाव पोलिस स्टेशन मार्फेत करण्यात आले आहे.

 

Protected Content