जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरुण शिवाजी उद्यानातील जे.के.पार्क येथे चालवल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पेालिसांनी छापा टाकून सात संशयीतांना रोकड सह अटक केली आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील मेहरुण येथीली जेकेपार्क शेजारील तरणतलावाच्या शेजारीच बाभळीच्या झुडपांमध्ये जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची गुप्त माहिती पेालिस निरीक्षक विनायक लोकरे यांना भेटली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतूल वंजारी, रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील अशांचे पथक तयार करुन कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. पोलिस पथकाने दुपारी येथे छापाटाकल्यावर वना राघेा पाटील(वय-३०),राहुल जनार्दन पाटील (वय-३०), राजेंद्र प्रभाकर ठाकुर (वय-२९)तीघे कुसूंबा, समाधान उत्तम पाटील(वय-३१)राकेश धनराज हटकर(वय-२३), लखन सुधाकर चौधरी(वय-३० मेहरुण),आनंदा शांतराम पाटील (वय-३८) अशा सात संशयीतांना पत्त्याच्या घोळातील ३ हजार ४३० रुपये रोख, जुगाराचे साहित्य जप्त करुन पोलिस नाईक सचिन किरण पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.