Home Cities यावल गैबनशाह बाबांच्या दर्ग्यात ऊरूस व लंगर

गैबनशाह बाबांच्या दर्ग्यात ऊरूस व लंगर

0
39
savkhedesim dargah

savkhedesim dargah

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडेसीम येथील गैबनशाह बाबा यांच्या दर्ग्यात उरूस शरीफ व लंगरे आम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात कासिम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक विधी संदर्भातील प्रवचन झाले. याप्रसंगी मोहम्मद रजा कादरी हैदराबाद, मोहम्मद महमूद रजा चोपडा, मोहम्मद शरीफ उल हक कादरी रजवी सांगवी, मुजाहिद रजवी चोपडा, हसन रजा छोटे सावखेडा, आलम गुलाम यासीन इक्बाल दिलदार तडवी, शरीफ रजा कादरी आदींनीही धार्मिक मार्गदर्शन केले. सालाबादप्रमाण होणारा कार्यक्रम यावर्षी देखील कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हिंदू-मुस्लिम एकता मंच कमिटीच्या माध्यमातुन या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी रूहानी गैबन शाह बाबांच्या दर्गावर आर्कषक रोषणाई करण्यात आली होती.


Protected Content

Play sound