चोपडा प्रतिनिधी । ग.स.नोकरभरती बनावट दस्तऐवज प्रकरणी न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करणार असल्याची माहिती रावसाहेब मांगो पाटील यांनी दिली.
६ मे २०१६ रोजी ग.स.संस्थेने नोकरभरती करीता कर्मचारी आकृतीबंध सादर करतांना एकूण ५४ पदे सरळसेवेने भरतीसाठी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. संस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावानुसार व्यवस्थापकीय खर्च भागभांडवलाच्या प्रमाणाशी 2 टक्केपेक्षा अधिक असू नये, अशी अट असल्यामुळे तत्कालीन चेअरमन व व्यवस्थापक यांनी दाखल केलेल्या त्याच कालावधीचा व्यवस्थापकीय खर्चामध्ये कोट्यावधी रूपयांचा फरक आहे. तसेच संस्थेचे माजी चेअरमन विलास नेरकर व्यवस्थापक व संचालक मंडळ यांनी कटकारस्थान करून में उच्च न्यायालयात देखील व्यवस्थापन खर्चाबाबत विसंगती दाखविणारा खुलासा सादर केलेला आहे. तसेच नोकर भरतीत ६३ जागा नातेवाईकाच्या भरलेल्या आहेत. त्यामुळे नोकर भरतीसाठी संस्थेच्या सर्व सभासदांची तसेच न्यायालयाची देखील दिशाभुल संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापक तसेच संचालकांच्या बेपरवाईमुळे झालेली असून याबाबत तक्रारदार रावसाहेब मांगो पाटील यांनी जळगाव पोलिस अधीक्षक यांच्याकडे २५ ऑक्टोंबर २०१८ रोजी रितसर तक्रार दिलेली आहे. येत्या 8 दिवसात बनावट दस्तऐवज सादर करणाऱ्या सर्व संचालकांविरोधात क्रिमिनल रिट पिटीशन दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.