चौगाव येथे वृक्षांचा वाढदिवस साजरा

arborist water trees

चोपडा, प्रतिनिधी । गेल्यावर्षी आजच्या दिवशी चौगाव येथे श्री क्षेत्र त्रिवेणी मंदिर व विजयगड परीसरात चोपडा तालुका निसर्ग मित्र समिती मार्फत सुमारे 200 वड व पिंपळाची झाडे लावण्यात आली होती. त्या झाडांचा प्रथम वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.

तसेच नविन वृक्षलागवड करण्यात आली व किल्ला संवर्धन करण्यात आले. याप्रसंगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे सातारा गादीचे तेरावे वंशज विशाल राजे भोसले, उपवन संरक्षक पी.टी.मोरणकर, चोपडा पंचायत समितीचे सभापती आत्माराम भाऊ म्हळके, वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, वन क्षेत्रपाल पी.बी.पाटील, वनरक्षक के.एल.धनगर, शिवछत्रपती परीवाराचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, अमोल पाटील सहीत संपुर्ण महाराष्ट्रातील मावळे, दुर्गवीर संस्थानचे राहूल पाटील, पंचायत समिती सदस्य बापुराव पाटील, कृषी विस्तार अधिकारी सतिष कोळी, आर.आर.सोनवणे, राजेंद्र ढोडरे, निसर्ग मित्र समितीचे तालुकाध्यक्ष वासु महाजन, जिल्हा सचिव दिनेश बाविस्कर, विश्राम तेले तालुका संपर्क प्रमुख, महेंद्र राजपुत, राहूल गवळी, योगेश कुंभार, पंकज शिंदे, प्रविण देशमुख, पत्रकार आत्माराम पाटील, परेश पालिवाल, संदिप पाटिल, कांतिलाल पाटील, दिपक पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content