जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने १९५० मध्ये केली होती आणि त्याचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता हा असून या औचित्याने ता. ६, शनिवार रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “इनोव्हेशन, आयपीआर अँड हेल्थ केअर” तसेच “स्ट्रेस फ्री लाईफ” या विषयांवर पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करत जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आरोग्याचा सर्वोच्च बिंदू आहे आनंद, त्याचे रहस्य भारतीय परंपरांत दडलेले आहे, आपण ते पुन्हा अंगीकारावे तसेच आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरूस्त असणे गरजेचे असून जगभरातील लोकांना आरोग्याप्रति जागरूक करण्यासाठी आणि निरोगी आरोग्य हीच आयुष्याची शिदोरी आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने आज रायसोनी इस्टीट्यूटच्या वतीने पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुधीर शाह व हेल्थकेअर रिसर्चर महेंद्र पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले असून या व्याख्यानाचा उपस्थितांना नक्कीच फायदा होईल असे त्यांनी यावेळी म्हटले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवानी यांनी तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. अमोल जोशी यांनी कार्यक्रमाचे समन्वय साधले व आभार व्यक्त केले तसेच यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.