उंबरवाडी येथे शहीद जवान चौगुलेंवर अंत्यसंस्कार

kolhapur jotiba

कोल्हापूर वृत्तसंस्था । गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर उंबरवाडी येथे आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये रविवारी (दि.16 डिसेंबर) रात्री अतिरेकी हल्ल्यात शहीद झाली. दोन दिवसांनंतर, त्यांना त्यांच्या गावी आणण्यात आले आहे.

जवान जोतिबा चौगुले यांच्या अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या गावातील लोकांनी चौगुले यांना आलेल्या वीरमरणाचा अभिमान व्यक्त केला. याशिवाय गावातल्या तरुणांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही केला. चौगुले यांना आदरांजली वाहण्यासाठी महागाव आणि उंबरवाडीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. महागावाची बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून चौगुलेंना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, चौगुलेंच्या अंत्ययात्रेसाठी शाळेतील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते. त्यासोबतच शोकाकूल वातावरणात चौगुलेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चौगुलेंना शेवटचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावलेले.

Protected Content