यावल प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथे आत्महत्या केलेल्या तरूणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांचे जाबजबाब घेण्यात आले असून मयताची पत्नी मात्र अंत्यविधीस अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
किनगाव येथील तुषार गोपाळ राणे वय ३२ या तरूणाच्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबाचे बुधवारी पोलीसांच्या वतीने जाबजवाब घेण्यात आले तर मयत तुषार राणे यांची पत्नी रत्ना तुषार राणे ह्या आपल्या पतीच्या अंत्यविधी उपस्थित नव्हत्या. पत्नीच्या व विविध संघटनेच्या जाचास कंटाळून राणे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी यापूर्वीच केलेला आहे.
पोलिसांकडून घेतलेले जाब जवाब पोलीस प्रशासनाच्या तज्ञांकडे पाठवण्यात येणार असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर या प्रकरणी कारवाईची पुढील दिशा पोलीस प्रशासन ठरवेल व त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी सांगीतले.
दरम्यान मंगळवारी दुपारी तुषार राणे यांचेवर किनगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राणे यांच्या कटुंबाकडून अंत्यविधी यात्रेचा निरोप देऊनही पत्नी रत्ना राणे या अंत्यदर्शनासाठी आल्या नसल्याचे राणे कुटुंबियांनी सांगितले.