पूरग्रस्तांसाठी ईदगाह मैदानावर जमा केलेला निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

madat

 

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुस्लिम कब्रस्तान व ईद गाह ट्रस्टतर्फे बकरी ईदच्या दिवशी पूरग्रस्तांसाठी ईदगाह मैदानावर 51 हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. तो निधी आज दि. 28 ऑगस्ट रोजी मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना सुपूर्द केला आहे. व ढाकणे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य निधीत जमा केला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी ढाकणे यांनी मुस्लीम बंधवांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. ते म्हणाले, जळगाव शहरात काही दिवसांपासून आपसात होत असलेल्या वादामुळे काही लोक त्यास जातीय वादाचे स्वरूप देत आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत असल्याने आपण मुस्लिम समाजाला सुद्धा योग्य ते मार्गदर्शन करावे. समाजाला दिशा द्यावी, तसेच आपल्या समाजातील मुलींना-मुलांना शिक्षणाकडे वळवून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, कारण कोणत्याही दंगलीत नुकसान हे सर्व सामान्य व गरीब माणसांचे होत असते. असे भावनावष आव्हान त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केले. ईदगह ट्रस्टतर्फे फारूक शेख यांनी विनंती केली की, लवकरच आम्ही मुस्लिम समाजाच्या तरुणांसोबत आपले सुस्वाद ठेवूया. त्यावेळी तुम्ही मोलाचे मार्गदर्शन करत अनुभव कथन करावे, जेणे करुन समाजाला एक चांगला संदेश जाईल, असे निमंत्रण देण्यात आले असून जिल्हाधिकारी ढाकणे यांनी त्यास स्वीकृती दिली आहे. तसेच लवकरच हा कार्यक्रम शहरात घेणार असल्याचे मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी यावेळी सांगितले आहे. याप्रसंगी जनरल सेक्रेटरी फारुक शेख, खजिनदार अश्फाक बागवान, संचालक ताहेर शेख, नजीर मुलतानी, मझर खान व आदी उपस्थितीत होते.

Protected Content