आपल्या मुलीने आत्महत्या नव्हे तर, पतीने खून केलाय ; नातेवाईकांचा गंभीर आरोप

57688de6 4cf3 4f81 9724 160c319e856b

जळगाव प्रतिनिधी| शहरातील शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतू आपल्या मुलीने आत्महत्या नव्हे तर, पतीने तिचा खून केला आहे. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करावा, असा पवित्रा मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान माहेरच्या मंडळींच्या फिर्यादीवरून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, भाग्यश्री प्रशांत पाटील (वय 26, रा. नेहरूनगर) यांनी मध्यरात्री दीड वाजता छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मयत भाग्यश्री या शनिपेठ पोलिसात कार्यरत असलेले प्रशांत प्रकाश पाटील यांच्या पत्नी होत. भाग्यश्री यांनी रात्री गळफास आत्महत्या केल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले होते. दरम्यान, सासरच्या मंडळींनी आरोप केला आहे की, यापूर्वी पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील यांनी दारू पिऊन भाग्यश्रीला मारहाण करत होता. मुलगी रात्री दीड वाजता गळफास घेऊन मयत झाल्यानंतरही अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलाही गुन्हा देखील दाखल झालेला नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

 

इनकॅमेरा शवविच्छेदन ; महसूलचे कर्मचारी पंच

 

महिलेच्या मृतदेहावर इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पंच म्हणून तहसीलदार विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. तर मृतदेह घेण्यास नकार देण्याचा पवित्रा महिलेच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली आहे. विभागीय पोलीस अधिकारी नीलाभ रोहन यांनी नातेवाईकांची भेट घेत वैद्यकीय अहवालानंतरच गुन्हा दाखल करणार, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांनी पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करावाच लागेल, असा पवित्रा घेतला होता. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

Protected Content