Home Cities चाळीसगाव पर्यावरण बाबींसाठी पातोंडा परिसर विकास मंचला निधी

पर्यावरण बाबींसाठी पातोंडा परिसर विकास मंचला निधी

0
29


पातोंडा ता.अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पर्यावरण घटकांवर काम करण्यासाठी पातोंडा परिसर विकास मंच संस्थेला खान्देश मराठा पाटील मंडळ कल्याणचे सचिव प्रविण पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नातील खर्च वाचवून पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांची आर्थिक देणगी नववधू-वराच्या हस्ते संस्थेला दिली आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी ही देणगी खर्च करण्यात येणार असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले. गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैसर्गिक घटकांवर काम करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक देणगी दिल्याच्या कृत्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले जाते. यावेळी मनपाचे माजी अधिकारी कपिल पवार, पातोंडा विकास संस्थेचे विलास चव्हाण, राजन बिरारी आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound