जामनेर प्रतिनिधी । ना. गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जामनेर तालुक्यातील तब्बल नऊ कोटी रूपयांच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली आहे.
या कामांमध्ये जामनेर तालुक्यातिल प्र.जि. मा. २९ ते शेळगाव लांबी ३.८१ किमी करिता २कोटी ६२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. रा.मा ४६ वरील भारुडखेडे ते कुंभारी रस्त्याच्यासाठी २ कोटी४६ लाख रूपये ; प्र.जि.मा ५ ते भागदारा रस्त्याकरिता ३कोटी ६० लाख मंजूर झाले आहेत. या तीन रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण साठी (पुल/मोर्यांच्या कामासह ) तसेच देखभाल दुरुस्तीसाठी ४२ लक्ष असे एकूण सुमारे ९ कोटी ४२लाखाचा निधींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी सतत पाठपुरावा केला होता. या कामांमुळे तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचा कायापालट होणार असल्याने परिसरातील जनतेने ना. गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.