उच्चशिक्षण घेऊन आई-वडिलांच स्वप्नं पूर्ण करा – डॉ.उल्हास पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आई-वडिल पहिले गुरु आणि त्या गुरुंचे स्वप्नं पूर्ण करणे ही आपली प्रथम जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपले आई वडिलांच्या कष्टाची जाणिव ठेवून त्याचे चीज करावे. केवळ डिग्री पर्यंतच मर्यादित न राहता पीएचडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करा, गोदावरी या नामांकित संस्थेत तुम्ही शिक्षण घेत असून निश्चितच तुमच्यातील कला-कौशल्यांचा विकास होऊन तुम्ही खूप मोठे व्हाल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केले.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सर्वपल्‍ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्‍त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन गोदावरी फाऊंडेनशचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.केतकी पाटील नर्सिंग स्कूलचे प्रिंसीपल शिवानंद बिरादर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ, नर्सिंग सुपरिटेडेंट संकेत पाटील हे उपस्थीत होते. मान्यवरांच्याहस्ते डॉ.सर्वपल्‍ली राधाकृष्णन यांच्याहस्ते प्रतिमेस मार्ल्यापण व दिपप्रज्वलन करण्यात आले. उपप्राचार्या विशाखा वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ.उल्हास पाटील यांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकांना प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फेही डॉ.उल्हास पाटील यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणारा मोमेन्टो देण्यात आला.

पुढे बोलतांना डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, उच्चशिक्षण घेऊन आई वडिलांचे नाव मोठे करा, येथील सर्व स्टाफ हा उच्चशिक्षीत असून प्रयत्नवादी आहे, तुम्ही मोेठे व्हा, सतत शिकत राहा, आजच काम आज, आताच करा, स्किललॅबमध्ये अधिक वेळ द्या अशा टिप्स देखील यावेळी डॉ.पाटील यांनी दिल्यात. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे शिक्षकाचे आयुष्याचे वर्णन करण्यात आले. याप्रसंगी मुक्‍ता पवार हिने मनोगत तर आकाश वाघमारे या विद्यार्थ्याने ‘मर्गा सापडायला शिखरासारखा, गुरु जीवनामध्ये देवळासारखा..’ ही कविता सादर करुन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा व्यक्‍त केल्यात. याप्रसंगी शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना शॉर्ट व्हिडीओद्वारे उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्र्रास्ताविक उपप्राचार्या विशाखा वाघ यांनी केले. त्यानंतर प्रिंसीपल शिवानंद बिरादर यांनी सांगितले की, तुम्हाल काय बनायचे आहे, त्याची निर्मिती तुम्ही स्वत:च करु शकता, त्यासाठी तुमचे शिक्षक नेहमीच मदत करतील. माझ्या आयुष्यातील गुरु म्हणजे डॉ.उल्हास पाटील सर, त्यांच्यामुळेच मी घडलो. तुम्ही देखील ध्येय निश्चित करा, कोणीही परिपूर्ण नसतो, यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे आवाहनही यावेळी बिरादर यांनी केले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर यांनी शिक्षकांचे महत्व विशद केले, नर्सिंग क्षेत्र येथे थेअरीसोबत प्रात्याक्षिकालाही तितकेच महत्व आहे, त्यामुळे अभ्यास करा पण पेशंटची निस्वार्थभावाने सेवा-सुश्रृषा देखील करणे गरजेचे असल्याचे डॉ.आर्विकर म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची, संस्कृती या विद्यार्थीनींनी तर आभार साक्षी हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

लाईव्ह गुरुंना वंदन – डॉ.पंडित 

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. आपण सर्वच जण नशिबवान आहोत असे सांगत ते म्हणाले की, आपणा सर्वांसमोर एक लाईव्ह गुरु आहे ते म्हणजे डॉ.उल्हास पाटील सर.. दररोज सकाळी हॉस्पिटलच्या राऊंडमध्येही ते चालता चालताही खूप शिकवितात, लहान लहान टिप्सद्वारे ते त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला घडवितात, अशा लाईव्ह गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही डॉ.पंडित यांनी दिल्यात.

Protected Content