तीन गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला पुण्यातून अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तिन गुन्ह्यात फरार तसेच एमपीडीए कारवाईसाठी अत्यावश्यक असलेल्या फरार गुन्हेगाराला रविवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून शिताफीने भर पावसात शोधून अटक करण्यात यश मिळवले आहे. योगेश उर्फ रितीक डिगंबर कोल्हे (रा.आसोदा ता. जि. जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारचे नाव आहे. त्याला पुढील कारवाईकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील अधिनस्त पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, इश्वर पाटील आदींच्या पथकाने या कारवाईत झोकून देत फरार आरोपीस अटक करण्याकामी सहभाग घेतला.

जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल दोन आणि नेपानगर मध्यप्रदेशातील एक अशा तिन गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. नेपानगरचे पोलिस देखील त्याच्या मागावर होते. योगेश कोल्हे याच्या अटकेमुळे नेपानगर येथे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. चो-या, घरफोड्या करण्यात योगेशचा हातखंडा असून तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहे. वारंवार त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. तरीदेखील त्याच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या वर्तनात कोणताही सकारत्मक बदल दिसून येत नव्हता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली. तो फरार असल्यामुळे त्याचा शोध पोलिस दलातर्फे सुरुच होता. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याला पुणे चिंचवड परिसरातून शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास पथकाचे कौतुक होत आहे.

Protected Content