
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षकांनी बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सध्या जळगाव जिल्हयातील व इतर जिल्हयातील गंभीर गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते.


त्यांनुसार बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोहवा प्रमोद लाडवंजारी व पोहवा किरण धनगर यांना यावल भागातील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते. पोहवा प्रमोद लाडवंजारी व किरण धनगर यांना निमगाव ता. यावल गावातुन गोपीनीय माहिती प्राप्त झाली की, तळोदा पोलीस स्टेशन जि. नंदुरबार गुर नं. ३१/२०२३ भादवि कलम ३९५,३९४,३४२,५०६ प्रमाणे दाखल दरोडा या गुन्हयातील आरोपी आशिष तायडे यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल असुन तो गुन्हा घडल्यापासुन फरार आहे व तो त्याचे अस्तित्व लपुन छुप्या पध्दतीने गावात राहत आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात पोहवा प्रमोद लाडवंजारी व पोहवा किरण धनगर यांनी प्राप्त गोपीनीय माहीतीवरुन निमगाव ता.यावल या गावात सापळा रचुन अशिष तायडे हा त्याचे राहत्या घराच्या गल्लीमध्ये उभा असताना त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने नाव आशिष विलास तायडे (वय २५ वर्षे रा. निमगाव रा.यावल) असे सांगितले. आशिष तायडे यास ताब्यात घेतल्याबाबतची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळवुन त्यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस स्टेशन तळोदा जि. नंदुरबार यांना कळविले असता नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे पोहवा २१८ देविदास वडवी सोबत पोलीस पथक आल्याने गुन्हयाच्या पुढील तपासा कामी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्याची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, अन्नपुर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधीक्षक, फैजपुर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


