नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातले मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईत आज पेट्रोल 5 पैशांनी महागले आहे. डिझेलच्या दरातही 9 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.35 रुपयांवर तर पेट्रोलसाठी 76.78 रुपये झाला आहे.
शातील तेल कंपन्या प्रत्येक दिवशी पेट्रोल – डिझेलच्या किंमतींची समीक्षा करतात आणि नवे दर प्रत्येक दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल पंपांवर लागू होतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या आधारावर हे दर ठरवले जातात. यासाठी १५ दिवसांची सरासरी किंमत विचारात घेतली जाते. याशिवाय रुपया आणि डॉलरच्या विनिमय दरांचाही इंधनाच्या किंमतींवर प्रभाव दिसून येतो.