मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे १ मे २०२५ पासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढले – आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर १९ रुपये शुल्क लागू होईल, जे पूर्वी १७ रुपये होते. बॅलन्स चौकशी शुल्क वाढले. खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी आता ७ रुपये आकारले जातील, जे आधी ६ रुपये होते. मोफत व्यवहार मर्यादा ओलांडल्यानंतर शुल्क लागू – ग्राहकांनी त्यांच्या बँकेच्या मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास हे अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
एटीएम इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला एटीएम सेवा पुरवण्यासाठी दिले जाणारे शुल्क. हे शुल्क सहसा ग्राहकांकडून त्यांच्या बँकिंग खर्चाचा भाग म्हणून वसूल केले जाते. मोफत व्यवहारांची मर्यादा, मेट्रो शहरांमध्ये: ग्राहकांना दरमहा ५ मोफत व्यवहार करता येतात,नॉन-मेट्रो शहरांमध्ये: ग्राहकांना दरमहा ३ मोफत व्यवहार करण्याची परवानगी आहे, जर ग्राहकांनी ही मर्यादा ओलांडली, तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी निश्चित शुल्क आकारले जाईल, एटीएम ऑपरेटर्सच्या विनंतीनंतर निर्णय, व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर्सनी वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे ही शुल्कवाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे RBI ने हे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला.
डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे रोख व्यवहारांमध्ये मोठी घट झाली आहे. ऑनलाइन वॉलेट्स आणि UPI व्यवहारामुळे ग्राहकांना रोख रक्कम काढण्याची गरज कमी वाटू लागली आहे. सरकारी आकडेवारीनुसार: २०१४ मध्ये भारतात ९५२ लाख कोटी रुपयांचे डिजिटल पेमेंट झाले, २०२३ पर्यंत हा आकडा ३,६५८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, फेब्रुवारी २०२५ मध्ये UPI द्वारे १,६११ कोटी व्यवहार झाले, ज्यात २१.९६ लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले.
लहान बँकांच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहारांचा झपाट्याने विस्तार होत असल्याने एटीएम व्यवहारांकडे ग्राहकांचा कल कमी होत आहे. रोख रक्कम काढण्याच्या सवयींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे ग्राहकांनी आता आपल्या बँकिंग सवयी बदलण्याची गरज आहे. डिजिटल व्यवहारांचा अधिक वापर करून हे अतिरिक्त शुल्क टाळता येऊ शकते