Home क्राईम जुन्या वादातून तरूणासह मित्रांवर तिक्ष्ण हत्याराने वार !

जुन्या वादातून तरूणासह मित्रांवर तिक्ष्ण हत्याराने वार !


जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगरात हनुमान मंदीराजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून शनिवारी १८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता तरूणासह त्यांच्यासोबत असलेल्या दोन जणांना तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी १९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्यानगरातील हनुमान मंदीराजवळ दिनेश विजय कांबळे वय २७ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता दिनेश हा त्याचे मित्र अर्जून रविंद्र महाजन आणि निर्मल विनोद पाटील दोन्ही रा. हनुमान मंदीर, अयोध्या नगर यांच्यासोबत गप्पा मारत होता. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून गल्लीत राहणारे रोहित शिंदे, बब्या यादव, हितेश झोनवाल, ज्ञानेश्वर पाटील, हर्षल पाटील, कुणाल पाटील सर्व राहणार अयोध्या नगर यांनी चाकूसारक्ष्या तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दिनेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहित शिंदे, बब्या यादव, हितेश झोनवाल, ज्ञानेश्वर पाटील, हर्षल पाटील, कुणाल पाटील सर्व रा. अयोध्या नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound