जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार अॅड. जमील देशपांडे शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अॅड. जमील देशपांडे शुक्रवारी सकाळी १० वाजता शिवाजी पुतळ्यापासून युक्ती प्रदर्शन करत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात जाणार आहेत. याप्रसंगी मनसेचे नेते अॅड. जयप्रकाश बाविस्कर, माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी सर्व हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे मनसेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.